Harshvardhan Patil : प्रत्येक टर्ममध्ये मंत्रिपद... महाराष्ट्रातील एकमेव आमदार : हर्षवर्धन पाटील

Vijaykumar Dudhale

झेडपीतून राजकीय इनिंगला सुरुवात

हर्षवर्धन पाटील यांचा जन्म 21ऑगस्ट 1963 रोजी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे झाला. काँग्रेसचे माजी खासदार शंकरराव पाटील हे त्यांचे चुलते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांनी पुणे जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक 1992 मध्ये लढवली आणि जिंकली. त्याचवेळी ते पुणे जिल्हा सहकारी संघावर (कात्रज) निवडून आले होते.

Harshvardhan Pati | Sarkarnama

अपक्ष निवडणूक

पाटील यांनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली. पण, काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि गणपतराव देशमुख यांचा पराभव केला.

Harshvardhan Patil | Sarkarnama

पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी

पहिलीच निवडणूक जिंकलेल्या पाटलांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये ते शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झाले. त्यांच्याकडे कृषी व जलसंधारण खात्याचा कारभार होता.

Harshvardhan Patil | Sarkarnama

दीडच दिवसात मंत्रिपदाचा राजीनामा

शिवसेना-भाजप युतीच्या पाठिंब्यावरच हर्षवर्धन पाटील यांनी 1999 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली. त्यातही ते विजयी झाले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला पाठिंबा दिला. मात्र, जंबो मंत्रिमंडळामुळे अवघ्या दीडच दिवसात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण 2002 मध्ये शेकापने सरकारचा पाठिंबा काढून घेतला, त्यावेळी अपक्षांना मंत्री करण्यात आले. त्यात ते कॅबिनेटमंत्री झाले.

Harshvardhan Patil | Sarkarnama

प्रथमच काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक

काँग्रेसच्या पाठिंब्यावर हर्षवर्धन पाटील यांनी 2004 मध्ये पुन्हा अपक्ष निवडणूक लढवली. त्यात पुन्हा विजयी झाले. सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये ते संसदीय कार्य आणि महिला बालकल्याणमंत्री झाले. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच काँग्रेसच्या चिन्हावर 2007 मध्ये त्यांच्या गटाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या.

Harshvardhan Patil | Sarkarnama

2009 मध्ये सहकारमंत्री

हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या चिन्हावर 2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी दत्तात्रेय भरणेंचा 7 हजार मतांनी पराभव केला. त्या टर्ममध्ये ते सहकारमंत्री बनले होते.

Harshvardhan Patil | Sarkarnama

आयुष्यातील पहिला पराभव

काँग्रेस आणि राष्ट्रवादी 2014 च्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी इंदापुरात काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीकडून दत्तात्रेय भरणे यांच्यात निवडणूक झाली. त्यात भरणे हे 14 हजार मतांनी जिंकले आणि हर्षवर्धन पाटील यांचा पहिल्यांदाच निवडणुकीत पराभव झाला.

Harshvardhan Patil | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

हर्षवर्धन पाटील यांनी 11 ऑगस्ट 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, विधानसभेला पुन्हा दत्तात्रेय भरणेंकडून 3110 मतांनी पराभूत झाले.

Harshvardhan Patil | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात केला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा जल्लोष...

CM Eknath Shinde | Sarkarnama
NEXT : येथे क्लिक करा