Jagdish Patil
हरियाणा पोलीस विभागातील अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय. एस. पूरन कुमार यांनी चंदीगढमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
पूरन यांच्या आत्महत्येमुळे हरियाणा पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पूरन यांनी सोमवारी त्यांच्या गनमॅनकडून पिस्तूल घेतलं आणि मंगळवारी दुपारी राहत्या घरातील बेसमेंटमध्ये ते मृतावस्थेत आढळले.
नऊ दिवसांपूर्वीच त्यांनी पीटीसी सुनारियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. आत्महत्या केली त्यादिवशी ते रजेवर होते.
आत्महत्येपूर्वी लिहिलिल्या सुसाईट नोटमध्ये त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. तर आत्महत्येला भ्रष्टाचाराचा मुद्दाही कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.
स्वत:ला गोळी घालून आयुष्य संपवणारे पोलीस महासंचालक वाय. एस. पूरन कुमार नेमके कोण होते ते जाणून घेऊया.
पूरन कुमार हे 2001 च्या बॅचचे IPS अधिकारी होते. ते हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस होते.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यांची पत्नी अमनीत पी. कुमार या 2001 बॅचच्या हरियाणा केडरच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत.
पूरन कुमार यांनी आत्महत्या केली तेव्हा अमनीत पी. कुमार या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर गेल्या होत्या.