Jagdish Patil
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हरियाणात मोठा धक्का बसला आहे.
कारण गुरूवारी (ता.3 सप्टेंबर) सकाळपर्यंत भाजपचा प्रचार करणाऱ्या माजी खासदार अशोक तंवर यांनी दुपारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राहुल गांधींच्या प्रचारसभेत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत भाजपला धक्का देणारे अशोक तंवर कोण आहेत ते जाणून घेऊया.
तंवर हे हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून त्यांनी 2019 मध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने त्यांच्या जागी शैलजा यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 2021 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षात प्रवेश केला.
2022 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. मात्र तिथेही ते जास्त काळ रमले नाहीत.
त्यामुळे 2024 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशातच आता त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
अशोक तंवर सुशिक्षित नेते असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात MA, एम.फिल आणि PHD केली आहे.