Akshay Sabale
भाजप हरियाणात 48 जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. त्यानिमत्त भाजपनं सत्ता कशी खेचून आणली? याची कारणे पाहुया...
भाजपनं चार मंत्र्यांसह 14 आमदारांना तिकीट नाकारलं.
मुख्यमंत्री सैनी यांच्यासह तीन आमदारांचे मतदारसंघ बदलले.
23 जागांवर भाजपनं नवे चेहरे दिले. 2019 मध्ये पराभूत झालेल्यांना तिकीट देण्यात आलं नाही.
17 राखीव जागांपैकी 8 जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
काँग्रेसच्या नेत्या कुमारी सेलजा आणी माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांच्यातील मतभेद प्रचारावेळी उफाळून आले. या वादाचा फायदा भाजपला मिळाल्याचं बोललं जातं.