सरकारनामा ब्यूरो
हरयाणा 'केडरच्या आयपीएस' संगीता कालिया या त्यांच्या तडफदार कर्तृत्वामुळे प्रसिद्ध आहेत.
'आयपीएस' संगीता कालिया या हरयाणातील भिवानी जिल्ह्यातील आहेत.
हरियाणातील खासगी शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अशोका विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या आणि 'आयआरएस केडर' मिळाले
आवडते पद न मिळाल्यामुळे त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली आणि 'आयपीएस' केडर मिळवले.
अत्यंत मेहनती आणि निर्भीड महिला अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगीता कालिया या सेवेसाठी रोज 15 तास देतात.
कर्तव्यात कठोर असणाऱ्या संगीता कालिया या सामजिक कार्यक्रमातही तितक्याच सक्रिय आहेत.
सध्या त्या हरयाणातील अंबाला येथे रेल्वे खात्यात 'एसपी' पदावर कार्यरत आहेत.