सरकारनामा ब्यूरो
सगळ्या सुख सुविधा असूनही मन:शांतीच्या शोधात वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय भारती अरोरा यांनी घेतला.
हरियाणा केडरच्या माजी आयपीएस भारती या 1998 बॅचच्या अधिकारी आहेत.
हरियाणातील अनेक जिल्ह्यांच्या एसपी आणि कर्नल रेंजच्या आयजी पदावर त्यांनी काम केले, तसेच बॉम्बस्फोट आणि इतर महत्त्वाच्या प्रकरणांचाही तपास केला आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करताना त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही.
शक्तिशाली पोलिस अधिकारी म्हणून आपला ठसा उमटवला, त्यासाठी त्यांना शासनाकडून अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे.
कृष्णाच्या भक्तीत इतक्या तल्लीन झाल्या, की त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्यातच समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
मीराबाईप्रमाणे कृष्णाची पूजा करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी 10 वर्षांपूर्वीच सेवेतून निवृत्ती घेतली.