IPS Death Case Details : IPS अधिकाऱ्यावर का आली आत्महत्येची वेळ? ही आहेत धक्कादायक कारणे...

Rashmi Mane

गोळी झाडून आत्महत्या

हरियाणा पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणांना सध्या मोठा धक्का बसला आहे. राज्यातील वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी वयाच्या 52 व्या वर्षी दुपारी चंदीगड येथील त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

IPS Death Case

निवृत्तीचा कालावधी

पूरन कुमार नुकतेच इन्स्पेक्टर जनरल, पोलिस ट्रेनिंग सेंटर (PTC), सुनारिया, रोहतक म्हणून बदली झाले होते. त्यांचा निवृत्तीचा कालावधी मे 2033 मध्ये होता.

IPS Death Case

तात्काळ घटनास्थळी

मंगळवारी दुपारी सुमारे 1.30 वाजता सेक्टर 11 पोलिस ठाण्याला माहिती मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांचा मृतदेह घराच्या तळमजल्यावरील एका खोलीत आढळला.

IPS Death Case

घटनास्थळावरून

घटनास्थळावरून एक पिस्तुल, काही महत्त्वाचे दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि आठ पानांचे सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केले आहे.

IPS Death Case

विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत

पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार या स्वतः IAS अधिकारी असून सध्या हरियाणा सरकारच्या विदेश सहयोग विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.

IPS Death Case

लेखी तक्रारी

घटनेच्या वेळी त्या मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या प्रतिनिधीमंडळासोबत जपान दौर्‍यावर होत्या. मागील काही वर्षांत वाय. पूरन कुमार यांनी प्रशासनातील अन्याय, पदांवरील दुहेरी जबाबदारी, वाहन वाटपातील भेदभाव आणि जातीय छळ याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या.

IPS Death Case

प्रकरणाची चौकशी

अलीकडे रोहतक येथे एका दारू ठेकेदाराने पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध लाच मागितल्याची तक्रार दिली होती. त्या कॉन्स्टेबलचा संबंध कुमार यांच्या कार्यकाळाशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

IPS Death Case

Next : प्रवाशांसाठी खुशखबर, रेल्वेचा नवीन निर्णय; कंफर्म तिकिटाची तारीख बदलल्यास पैसे परत! काय आहे नियम? 

येथे क्लिक करा