New Rule : प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वेचा नवीन निर्णय; कंफर्म तिकिटाची तारीख बदलल्यास पैसे परत! काय आहे नियम?

Rashmi Mane

नवीन नियम

भारतीय रेल्वे प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर बनवण्यासाठी सतत नवीन नियम आणत आहे.

How to Book Confirm Train Ticket | Sarkarnama

प्रवाशांसाठी सुविधा

यात तिकीट बुकिंग प्रणालीत बदल करून फसवणूक रोखणे आणि प्रवाशांची सुविधा वाढवणे या दोन्ही बाबींचा समावेश आहे.

How to Book Confirm Train Ticket | Sarkarnama

तारीख बदलण्याची सुविधा

रेल्वेने आता कंफर्म तिकिटावर प्रवास करु न शकल्यास फक्त रद्द करण्याचा पर्याय नव्हे, तर तिकिटाची तारीख बदलण्याची सुविधाही सुरू केली आहे.

How to Book Confirm Train Ticket | Sarkarnama

तिकिटाची तारीख बदलू शकता

नवीन नियमांनुसार, प्रवासी आता आपल्या कंफर्म तिकिटाची यात्रा तारीख ऑनलाइन बदलू शकतील. ही सुविधा सुरुवातीला जानेवारी 2026 पासून लागू होईल.

How to Book Confirm Train Ticket | Sarkarnama

याआधी...

याआधी प्रवाश्यांना तिकिट रद्द करावे लागायचे, ज्यावर एसी फर्स्ट क्लास तिकिट रद्द केल्यास 240 रुपये + जीएसटी, एसी 2 टियर 200 रुपये + जीएसटी, एसी 3 टियर 180 रुपये + जीएसटी आणि स्लीपर क्लास 120 रुपये शुल्क भरावे लागायचे.

How to Book Confirm Train Ticket | Sarkarnama

कॅन्सलशन फी लागू होणार नाही

आता तिकिटाची तारीख बदलताना कोणताही कॅन्सलशन फी लागू होणार नाही, त्यामुळे प्रवाशांची बचत होणार आहे.

How to Book Confirm Train Ticket | Sarkarnama

रिफंड थेट खात्यात जमा

तिकिटाची तारीख बदलल्यास प्रवाश्यांना कॅन्सलशन फी' वाचेल. परंतु, नव्या तारीखेला सीट उपलब्ध नसेल तर तिकिट वेटिंगमध्ये जाईल. तसेच, जर नवीन तिकिटाच्या दरामध्ये फरक असेल, तर अधिक असल्यास प्रवाश्याला भरावे लागेल आणि कमी असल्यास रिफंड केले जाईल. रिफंड थेट प्रवाश्याच्या खात्यात जमा केला जाईल.

How to Book Confirm Train Ticket | Sarkarnama

Next : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? सेबी देत आहे 1.84 लाखांपर्यंत पगारासह सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या डिटेल्स 

येथे क्लिक करा