Mangesh Mahale
देशभरात महिलांसाठी विविध योजना सुरु आहेत. हरियाणामध्येही 'लाडो लक्ष्मी' नावाने योजना चालवली जाते.
योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातात.
आता सरकार यात मोठा बदल करत आहे.
हरियाणातील नायब सैनी सरकारने'लाडो लक्ष्मी' योजनेचा दुसरा हप्ता नुकताच दिला आहे.
लाखो महिलांच्या खात्यात थेट २१०० रुपये जमा झाले.
१ नोव्हेंबरला पहिला हप्ता जारी झाल्यापासून आतापर्यंत सात लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळात आहे.
'लाडो लक्ष्मी' योजना अधिक मजबूत करण्यासाठी आता पैसे जमा करण्याच्या पद्धतीत बदल केला जात आहे.
आता दर महिन्याला 2100 रुपये देण्या ऐवजी, सरकार दर तीन महिन्याला एकाच वेळी 6300 रुपये जमा करणार आहे.