Pradeep Pendhare
बिहारमध्ये 'लेडी सिंघम' म्हणून प्रसिद्ध असलेल्या निधी राणी यांची भागलपूरच्या नवगचिया पोलिस जिल्ह्याचे एसपी म्हणून नियुक्ती
2014 बॅचच्या IPS अधिकारी असून, UPSC परीक्षेत 152 रँक मिळवली. शिक्षणाच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवेल आणि समाजात परिवर्तनाचे वारे वाहतील, अशी निधी यांची धारणा आहे.
बीडीओ कार्यालयाचे मुख्य लिपिक राज सिंग अहलावत यांची मुलगी असून निधी एमडीयूमधून प्लांट बायोटेकमध्ये पीएच.डी. केली आहे.
कुटुंबाबाहेर शिकायला जाण्यासाठी मुलींना बंदी होती. तरी देखील ती बंदी मोडून निधीने घराबाहेर शिक्षण घेत UPSC परीक्षेत यश मिळवले. निधी राणी अहलावत यांना भाऊ आणि बहीण आहे. बहीण एम.टेक करत आहे.
निधी राणी ज्याठिकाणी एसपी म्हणून जातात, तेथील मुलांना शिक्षण घेताना सुलभता आणि सुरक्षेवर भर देतात. पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भागलपूरमध्ये पोस्टिंगपूर्वी प्रशिक्षणादरम्यान निधी यांनी बिहारच्या झांझरपूरमध्ये डीएसपी म्हणून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केल्याने लेडी सिंघम म्हणू ओळख निर्माण झाली.
डायरा भागातील मुलींनी शाळा-कॉलेज किंवा घरातून सुरक्षितपणे घरी यावे, जेणेकरून त्या शिक्षण घेऊन नवगचिया बिहारला देशभरात प्रसिद्ध करू शकतील, असे निधीचे मत आहे.
प्रमोशन दरम्यान निधी यांची पहिली पोस्टिंग पटना येथे झाली होती. निधी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात माहीर आहेत.