Rashmi Mane
बरेच दिवसापासून पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता जूनपर्यंत येण्याच्या चर्चा होत्या, पण अद्याप ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही.
20 व्या हप्ताबद्दल अजून सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
पण पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा होतो हे कस तपासायचा आणि कुठेही न जाता पोर्टलवर कसा चेक करायचा ते पाहू.
पहिल्यांदा pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका. कॅप्चा कोड भरून ‘Get Data’ वर क्लिक करा.
हफ्ता मिळाली की नाही याची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.
नाव लिस्टमध्ये नसेल तर घाबरू नका. जवळच्या CSC सेंटर किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधा.
या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा 155261 किंवा या टॉल फ्रि क्रमांकावर 1800115526 कुठलाही प्रश्न विचारायचा असल्यास त्वरित मदत मिळेल.