Rajveer Singh Diler : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, राजवीर सिंह दिलेर यांचे निधन!

Mayur Ratnaparkhe

भाजपा खासदार राजवीर सिंह दिलेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

राजवीर सिंह दिलेर हे उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार होते.

अलीगड येथील वरुण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती.

मात्र, या लोकसभा निवडणुकीस भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती.

2019च्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झालेल्या भाजप(BJP) उमेदवारांच्या यादीत समाविष्ट राजवीर यांचे नाव होते. 

राजवीर सिंह दिलेर अडीच लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते.

यावेळी त्यांच्या जागी भाजपने राज्यमंत्री अनुप वाल्मिकी यांच्यावर विश्वास टाकला आहे.

घरी असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले होते.

Next : अदानी-अंबानी पासून मोदींवर टीका ते महालक्ष्मी लखपती योजना; राहुल गांधींच्या भाषणातील ठळक मुद्दे...