HCL Recruitment : HCL मध्ये बंपर भरती सुरु, पगार तब्बल 1.2 लाख रुपये; काय आहे पात्रता?

Rashmi Mane

मोठी संधी!

नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. Hindustan Copper Limited (HCL) मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

एचसीएल सुपरवायजरी ग्रेड अंतर्गत ज्युनिअर मॅनेजर (E0 Grade) पदांसाठी भरती होणार आहे. एकूण 13 विभागांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध.

HPCL Jobs 2025 Apply | Sarkarnama

उपलब्ध विभाग

मायनिंग, ज्युलॉजी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिविल, फायनान्स, एचआर, प्रशासन, इनवायरमेंट, मिनरल प्रोसेसिंग, मटेरियल कॉन्ट्रॅक्ट असे विविध विभाग तुमच्यासाठी खुले आहेत.

शैक्षणिक पात्रता

संबंधित विभागात पदवी (Bachelor’s Degree) अनिवार्य. काही पदांसाठी 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. तर फायनान्ससाठी CA पदवी, तर HR/Administration साठी ग्रॅज्युएट + अनुभव आवश्यक.

अर्ज प्रक्रिया सुरु

एचसीएलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. शेवटची तारीख 17 डिसेंबर 2025 आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड Computer-Based Test द्वारे केली जाणार आहे. यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.

पगार किती?

निवड झाल्यानंतर उमेदवारांना 30,000 ते 1,20,000 इतका आकर्षक पगार मिळणार आहे. सरकारी कंपनी असल्याने भविष्यातील सुविधा आणि स्थिरता हमखास मिळेल.

अर्ज कसा कराल?

www.hindustancopper.com या संकेतस्थळावर जा Career सेक्शन ओपन करा. Apply Online क्लिक करा. रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा. त्यानंतर बेसिक माहिती भरा आणि फोटो-सही अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.

आजच अर्ज करा!

सरकारी नोकरीची ही संधी हातातून जाऊ देऊ नका! स्थिर करिअर, उच्च पगार आणि प्रतिष्ठित सरकारी कंपनीत काम करण्याची सुवर्ण संधी आजच अर्ज करा आणि तुमचे भविष्य घडवा!

job | Sarkarnama

Next : वंदे, नमो अन् अमृत भारत! या तीन 'गेम चेंजर' गाड्यांमुळे प्रवासाला मिळणार नवी गती, वाचा तिन्ही ट्रेन्सची खासियत

येथे क्लिक करा