Rashmi Mane
भारतीय रेल्वे झपाट्याने आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाच्या नव्या गतीचे प्रतीक म्हणून वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत या तीन आधुनिक ट्रेन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या देशभरात 82 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. 2019 पासून या ट्रेनने आपल्या स्पीड, आरामदायी सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नवीन मापदंड निर्माण केले आहेत.
आता वंदे भारतचे स्लीपर व्हर्जनही येत आहे. 2026 पासून रात्रीच्या लांब प्रवासासाठी ही लक्झरी स्लीपर ट्रेन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान आणि आरामाचा अनोखा संगम यात पाहायला मिळेल.
नमो भारत रॅपिड रेल ही भारतातील सर्वात आधुनिक व जलद लोकल-ट्रॅन्सिट सेवा मानली जाते. वेग, सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ती इतरांपेक्षा वेगळी ठरते.
या ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कोच, महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिक–दिव्यांगांसाठी आरक्षित सीट्स उपलब्ध आहेत. सर्वांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास हा मुख्य उद्देश आहे.
प्रत्येक ट्रेनमध्ये अटेंडंटची सुविधा, पॅनिक बटण, व्हीलचेयर–स्ट्रेचर स्पेस यांसारखी वैशिष्ट्ये नमो भारतला खास बनवतात. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले गेले आहे.
अमृत भारत ही पहिली नॉन-एसी ट्रेन आहे ज्यात फायर डिटेक्शन सिस्टम बसवण्यात आली आहे. टॉकबॅक युनिट आणि गार्ड रूममधील रिस्पॉन्स युनिट सुरक्षितता अधिक मजबूत करतात.
फोल्डेबल स्नॅक्स टेबल, मोबाइल होल्डर, रेडियम स्ट्रिप्स, आरामदायी सीट्स, सुधारित बर्थ, फास्ट चार्जिंग पोर्ट हे सर्व कोचला पूर्णपणे आधुनिक बनवतात. दिव्यांगांसाठी विशेष शौचालयही उपलब्ध आहेत.