IAS ते HDFC चे अध्यक्ष! ज्यांच्या राजीनाम्यामुळे बँकिंग क्षेत्र हादरलं ते अतनु चक्रवर्ती कोण? गुजरात कनेक्शन जाणून घ्या

Jagdish Patil

अतनु चक्रवर्ती

HDFC बँकेचे पार्ट टाईम अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला.

HDFC Bank Chairman Resigns | Sarkarnama

बँकिंग क्षेत्र

त्यांच्या राजीनाम्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे तर बँकेच्या शेअरवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

Atanu Chakraborty resignation | Sarkarnama

कारण

चक्रवर्तींनी राजीनाम्याचे कारण बँकेतील कार्यपद्धती आणि प्रचलित काही कार्यप्रणाली असल्याचं म्हटलं आहे.

Atanu Chakraborty resignation | Sarkarnama

निर्णय

मागील 2 वर्षांत बँकेतील काही घडामोडी नैतिकतेशी सुसंगत नाहीत म्हणून हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.

Atanu Chakraborty resignation | Sarkarnama

गुजरात कॅडर

अतनु चक्रवर्ती हे गुजरात कॅडरमधील 1985 च्या तुकडीचे निवृत्त IAS अधिकारी आहेत.

Atanu Chakraborty resignation | Sarkarnama

निवृत्ती

एप्रिल 2020 मध्ये, आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव पदावरून ते निवृत्त झाले.

Atanu Chakraborty resignation | Sarkarnama

सचिव

चक्रवर्ती यांनी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणूनही काम केलंय.

Atanu Chakraborty resignation

भूमिका

विविध मंत्रालये आणि विभागांमधील आर्थिक धोरण निर्मिती प्रक्रियेत त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे.

Atanu Chakraborty resignation

अर्थसंकल्प

संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प प्रक्रियेवर देखरेख करण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.

Atanu Chakraborty resignation | Sarkarnama

अर्थ मंत्रालय

2002 ते 2007 या काळात त्यांनी अर्थ मंत्रालयात सेवा बजावली होती. सुरुवातीला संचालक त्यानंतर त्यांची सहसचिव पदी नियुक्ती झाली.

Atanu Chakraborty resignation | Sarkarnama

NEXT : भविष्य जाणून घेण्यासाठी बड्या नेत्यांच्या रांगा, चाकणकरांकडून पाद्यपूजा : बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या कॅप्टन खरातची हिस्ट्री...

Ashok Kharat arrest | Sarkarnama
क्लिक करा