Jagdish Patil
एका महिलेला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे.
खरातचे अनेक राजकीय नेत्यांसह अधिकारी, सेलिब्रिटींसोबत चांगले संबध आहेत. हे सर्व आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे जात होते.
पोलिसांनी खरातची चौकशी केली असता त्याच्याकडून 58 नामांकित महिला, सेलिब्रिटी संदर्भातील व्हिडीओ जप्त केले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासोबत फोटो असलेला खरात नेमका कोण आहे ते जाणून घेऊया.
सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे.
या मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आहेत.
तर चाकणकर यांनी खरातची पाद्यपूजा करताना आणि डोक्यावर छत्री धरतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
खरात प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ असून 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिरगावमधील मंदिराला भेट दिल्यानंतर तो चर्चेत आला.
कॅप्टन खरात मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी असून 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 154 देशांचे दौरे केल्यांचं सांगितलं जातं.