Vijaykumar Dudhale
पुणे शहरात बुधवारी (ता. 24 जुलै) सायंकाळपासून गुरुवारी (ता. 25 जुलै) सायंकाळपर्यंत 24 तासांत 104 मिलिमीटर पाऊस झाला आहे. खडकवासला धरण परिसरात दुपारी बारापर्यंत 484 मिमी पाऊस झाला होता. पुण्यात विशेषतः सिंहगड रस्ता, पाटील इस्टेट, संगमवाडी परिसरातील लोक वस्तीमध्ये पाणी शिरले आहे.
पुण्यात 32 वर्षांनंतर चोवीस तासांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, असा दावा हवामान तज्ज्ञ डॉ. अनुप कश्यम यांनी केला आहे.
पुणे शहरातील सुमारे 2192 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळांत आणि इतर अस्थापनांमध्ये त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.
खडकवासला धरणातून सुमारे 40 हजार क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तो पुढे भीमा नदीतून उजनी धरणात जात आहे.
मुसळधार पावसामुळे दोन राज्यमार्ग, पाच जिल्हा मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
विजेचा धक्का लागून पुण्याच्या भिडे पुलाजवळील पुलाची वाडी येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
‘एनडीआरएफ’च्या चार आणि लष्कराच्या दोन तुकड्या मदतीसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत.
पूरपरिस्थिती पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने मुंबईतून पुण्यात दाखल झाले. त्यांनी आपत्कालीन कक्षातून सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि दोन्ही महापलिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.