सरकारनामा ब्यूरो
झारखंडमधील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबात जन्मलेले हेमंत आणि कल्पना सोरेन यांचा विवाह पारंपरिक आणि आदिवासी पद्धतीने झाला होता.
लग्नानंतर त्यांचे नशीब बदलू लागले आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पहिल्यांदाच संसदीय राजकारणात यश मिळाले.
सातत्याने सोरेन हे सलग यशाच्या पायऱ्या चढत गेले आणि झारखंडच्या राजकारणातील एक प्रस्थापित चेहरा बनले.
कल्पना या मूळच्या ओडिशाच्या आहेत, पण त्यांचा जन्म रांचीमध्ये झाला.
मोठ्या राजकीय घराण्याशी निगडित असलेल्या कल्पना यांची आवड आणि कार्यक्षेत्र वेगळे असल्याने त्यांची बिझनेस वूमन म्हणून ओळख आहे.
राजकीयदृष्ट्या सक्रिय कुटुंबात राहूनही त्या स्वतःला राजकारणापासून लांब ठेवतात.
कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमात त्या सक्रिय सहभाग घेतात. या उपस्थितीमुळे लोकांमध्ये त्या खूप लोकप्रिय आहेत.
कल्पना या एक शाळाही चालवतात. त्यातून वेळ काढून महिला विकास कार्यक्रमात आवर्जून सहभागी होतात.