Chaitanya Machale
भाजपता बालेकिल्ला अशी ओळख असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी हेमंत रासने यांनी आत्तापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
हेमंत रासने हे 1988 पासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. गणेश मंडळाचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
पुणे महापालिकेत तीन टर्म नगरसेवक म्हणून रासने यांनी काम केलेले आहे.
पुणे महानगरपालिकेत सर्वात अधिक स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविणारी व्यक्ती असा रेकॅार्ड त्यांच्या नावावर आहे.
देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ते सरचिटणीस म्हणून काम पाहतात.
प्रसिद्ध अशा सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्षपद हेमंत रासने यांच्याकडे आहे.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढविली.
पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून लगेचच त्यांनी कामाला सुरुवात केली.
हेमंत रासने यांनी सुरू केलेल्या कामाची दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रासने यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.