MLA Sunil Shelke : भाजप मंत्र्याला चितपट करणारे आमदार सुनील शेळके...

Vijaykumar Dudhale

लोणावळा येथे जन्म

मावळ तालुक्यातील लोणावळा येथे जन्मलेले सुनील शेळके यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.

MLA Sunil Shelke | Sarkarnama

संघाशी एकनिष्ठ शेळके कुटुंबीय

शेळके यांची राजकीय पार्श्वभूमी ही जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ अशी होती. सुनील शेळके यांची पणजी तान्हाबाई रामबा शेळके ह्या जनसंघाच्या तिकिटावर निवडून आलेल्या तळेगाव नगरपरिषदेच्या पहिल्या महिला नगरसेविका होत.

MLA Sunil Shelke | Sarkarnama

आजोबा भाजपकडून तळेगावचे नगराध्यक्ष

सुनील शेळके यांचे आजोबा बाळासाहेब बाबूराव शेळके हे भाजपकडून तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष होते. शेळके यांचे मोठे बंधू सचिन हे भाजपकडून तळेगावचे नगराध्यक्ष होते.

MLA Sunil Shelke | Sarkarnama

भाजपमधून राजकीय श्रीगणेशा

सुनील शेळके हे 2004 पासून भाजपमध्ये सक्रीय होते. ते 2011 मध्ये तळेगाव नगरपरिषदेत भाजपच्या तिकिटावर निवडून आले. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

MLA Sunil Shelke | Sarkarnama

तळेगावचे भाजपचे नगराध्यक्ष

तळेगाव नगरपरिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष म्हणून 2016 मध्ये सुनील शेळके यांची नियुक्ती झाली होती.

MLA Sunil Shelke | Sarkarnama

भाजपने तिकिट नाकारले

संघाची पार्श्वभूमी आणि भाजपमध्ये सक्रीय असणारे सुनील शेळके हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मावळमधून इच्छूक होते. मात्र, भाजपने तत्कालीन राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांना भाजपचे तिकिट दिले.

MLA Sunil Shelke | Sarkarnama

राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे तिकिट बाळा भेगडे यांना जाहीर होताच सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधानसभेचे तिकिट मिळविले. त्यांना तिकिट देण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्वपूर्ण भूमिका होती. अजितदादांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेळके यांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

MLA Sunil Shelke | Sarkarnama

‘जायंट किलर’

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा लढविणाऱ्या सुनील शेळके यांनी भाजपचे तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा तब्बल 93 हजार मतांनी पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळमध्ये राष्ट्रवादीला विजय मिळवून देत शेळके हे ‘जायंट किलर’ ठरले.

MLA Sunil Shelke | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस जपानमधून मानद डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय!

Devendra Fadnavis | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा