Sachin Fulpagare
कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा हिजाबबंदीचा मुद्दा तापला आहे. या मुद्द्यावर राज्यातील नेत्यांमध्ये मतमांतर दिसून येत आहेत. यामुळे हिंजाबबंदीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
हिजाबबंदी मागे घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. हिजाबबंदीचा आदेश मागे घेण्याबाबत विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले.
हिजाबबंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत सिद्धारामय्या यांच्या वक्तव्यावर काही मंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे एसएस मल्लिकार्जुन म्हणाले.
कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत येऊन 6 महिन्यांहून अधिक झाले. यामुळे हिजाबबंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी चिंतनाची काय गरज आहे? असा सवाल एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी केला.
हिजाबबंदीचा निर्णय कर्नाटक सरकारने मागे घेतल्यास ज्यांनी मत दिले आहे, ते राज्यातील मुस्लिम खूश होतील, असे ओवैसी म्हणाले.
हिजाबबंदी मागे घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर कर्नाटक भाजपने संताप व्यक्त केला. शांततेच्या वातावरणात सिद्धारामय्या हे धर्माचे विष कालवत आहेत, असा आरोप भाजपने केला.
शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश एकच असावेत, यासाठी युनिफॉर्म पॉलिसी लागू करण्यात आली आहे. पण सिद्धारामय्या विद्यार्थ्यांच्या मनातही मतभेद निर्माण करत आहेत, असे भाजपने म्हटले.