Chetan Zadpe
भारतातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत मुंबईतील मलबारहिल या मतदाऱसंघातून निवडून आलेले मंगलप्रभात लोढा यांचा दहावा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे एकूण 441 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि अंबिकापूर या मतदारसंघातून आमदार असलेले टी. एस. सिंह देव यांची संपत्ती जवळपास 500 कोटी इतकी आहे. त्यांचा नववा क्रमांक लागतो.
घाटखोपर मतदारसंघाचे भाजप आमदार पराग शाह यांचा या यादीत आठवा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे जवळपास 500 कोटी इतकी आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पुलिवेंडुला मतदारसघातून निवडून आलेले जगनमोहन रेड्डी यांच्याजवळ 510 कोटींची संपत्ती आहे.
कर्नाटकच्या हेब्बाळ या मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार सुरेश बी एस. यांच्याजवळ 648 कोटींची संपत्ती आहे.
गुजरातच्या मन्सा या मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार जयंतीभाई पटेल यांची संपत्ती 661 कोटी एवढी आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलगू देसम या पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे कप्पन या मतदारसंघातून निवडून येतात. त्यांची संपत्ती 668 कोटी एवढी आहे. त
कर्नाटकच्या गोविंदराज नगर या मतदारसंघातून आमदार असलेले काँग्रेसचे प्रियकृष्ण यांची एकूण संपत्ती 1156 कोटींची आहे.
कर्नाटकच्या गौरी-बिदनूर या मतदारसंघातून अपक्ष निवडून येणारे आमदार के एच पुट्टास्वामी हे एक बाहुबली आमदार आहेत. त्यांची संपत्ती 1267 कोटी एवढी आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कणकपूर या मतदारसघातून निवडून येणारे डी, के, शिवकुमार देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1413 कोटी आहे.