Rajanand More
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांच्या पत्नी आहेत. राजकारणात सक्रीय असल्या तरी पहिल्यांदाच निवडणूक लढवली.
डेहरा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात. पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला.
काँग्रेसला या मतदारसंघात 24 वर्षानंतर विजय मिळाला आहे. त्यामुळे कमलेश या जायंट किलर ठरल्या आहेत.
होशियार सिंह भाजपचे उमेदवार होते. ते काँग्रेसच्या तिकीटावर मागील निवडणुकीत विजयी झाले होते. पण भाजपमध्ये गेल्याने पोटनिवडणूक झाली.
कमलेश ठाकूर 54 वर्षांच्या असून 1998 मध्ये सुखविंदर सुख्खू यांच्याशी विवाहबध्द झाल्या. त्यांना दोन मुली आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या कमलेश यांचे डेहरा येथे शालेय शिक्षण झाले. चंदीगडमध्ये सासकीय महाविद्यालयातून राजशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त.
विवाहापूर्वी एका शाळेमध्ये त्या शिक्षिका होत्या. आता त्यांची संपत्ती 9.14 कोटी असल्याचे शपथपत्रातून समोर आले आहे.
पहिलीच निवडणूक असली तरी त्या मागील दहा वर्षांपासून प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्या आहेत. पती राजकारणात सक्रीय असल्यामुळे राजकारणाचे डावपेच चांगलेच माहिती आहेत.
विजयानंतर कमलेश ठाकूर यांनी विजयाचे क्रेडिट मतदारांना दिले आहे. डेहरातील लोकांचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्या म्हणाल्या.