सरकारनामा ब्यूरो
हिमाचल प्रदेशची आर्थिक सुधारणा होण्यासाठी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी IAS आणि IPS यांच्या बदलीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हिमाचल प्रदेशातील रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रोहनचंद ठाकूर हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार आहेत.
गेल्या वर्षी त्यांच्या पत्नी मानसी सहाय ठाकुर या केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या. याकारणाने आता रोहनचंद ठाकूर यांनी दिल्लीला त्यांची बदली करून घेतली आहे.
कार्मिक मंत्रालयाने रोहनचंद यांची नियुक्ती संचालक वित्तीय सेवा या पदावर केली आहे. त्यांची सीएसएस (केंद्रीय कर्मचारी योजने) अंतर्गत पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाकूर यांच्या प्रतिनियुक्तीबाबत केंद्रीय कार्मिक विभागाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव प्रबोध सक्सेना यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
रोहनचंद ठाकूर हे 2009 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
त्यांनी दिल्लीतून सेंट स्टीफन्स या कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यानंतर अहमदाबाद येथून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून मास्टर पूर्ण केले.
2009च्या बॅचच्या चार IAS अधिकाऱ्यांची सचिव स्तरावर बढती करण्यात आली होती. यावेळी रोहनचंद यांच्यासह त्यांच्या पत्नी मानसी सहाय ठाकूर यांच्या नावाचा समावेश होता.