सरकारनामा ब्यूरो
14 फेब्रुवारी हा दिवशी प्रेमाचे दिवस म्हणून साजरा केला जातो. तर दिवसानिमित्ताने जाणून घेऊयात देशातील अनेक IAS आणि IPS अधिकारी यांची प्रेमकहाणी.
IPS मनोज कुमार आणि GST आयुक्त श्रद्धा यांची लव्हस्टोरी खूप प्रेरणादायी आहे. या जोडीने 5 डिसेंबर 2005 ला लग्न केले.यांच्या च्या लव्हस्टारीवर बाॅलिवूड मध्ये '12वी फेल' नावाचा चित्रपट बनवण्यात आला आहे.
2016 बॅचच्या IAS अधिकारी IAS टीना दाबी यांनी त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेले प्रदीप गावंडे 21 एप्रिल 2022 यांच्याशी लग्न केले. त्याची पहिली भेट कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झाली होती.
IAS अतहर आमिर खान आणि डॉ. मेहरीन काझी देशातील लोकप्रिय जोडप्यांपेकी एक आहेत. हे जोडप 1ऑक्टोबर 2022 ला लग्न बंधनात अडकले.
IPS नवज्योत सिमी यांनी 14 फेब्रुवारी 2020 ला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिवशी IAS तुषार सिंगलाबरोबर लग्न केले. या दोघांनी रजिस्टर लग्न केले होते. त्यामुळे ही जोडी खूप चर्चेत आली होती.
IAS सृष्टी जयंत देशमुख आणि IAS नागार्जुन बी गौडा यांची पहिली भेट प्रशिक्षणादरम्यान मसूरीच्या लाल बहादूर शास्त्री ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये झाली होती.पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अडीच वर्ष डेट करुन त्यांनी ऑगस्ट 2021ला लग्न केले.
आसाम केडरच्या IAS प्रेरणा शर्मा यांनी 2018 मध्ये यूपी कॅडर IAS मृदुल चौधरी यांच्याबरोबर लव्हमॅरेज केले.
IAS आस्तिक कुमार पांडेय आणि IPS मोक्षदा पाटील यांची भेट 2011 ला प्रशिक्षणादरम्यान झाली होती. दोघांत चांगली मैत्री झाली आणि याचचं रुपांतर प्रेमात झाले. दोघांची भाषा संस्कृती वेगळी तरीही या जोडीने सगळ्या गोष्टी सांभाळत 28 एप्रिल 2012ला लग्न केले.