Akshay Sabale
सोशल मीडियावर सक्रिय राहणे हिमाचल प्रदेशातील महिला अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.
ओशिन शर्मा असे त्यांचे नाव असून त्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मात्र, सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या नादात शासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून राज्य सरकारकडून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
त्यांच्या कार्यालयात अनेक कामे प्रलंबित पडलेली असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. यानंतर राज्य सरकारने त्यांची बदली केली.
एवढेच नव्हे तर तूर्त त्यांची अन्य कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर सतत सक्रिय राहिल्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत असल्याचे दिसून आले आहे.