Jagdish Patil
PM मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारला 17 सप्टेंबर रोजी 100 दिवस पूर्ण होत आहेत. या दिवशी मोदींचा वाढदिवस देखील आहे.
या 100 दिवसांत NDA सरकारने अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत खरीप पिकांचे आधारभूत मूल्य 100 ते 550 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला.
वक्फ सुधारणा विधेयक जेपीसी पाठवण्यात आलं असून त्यावर 18 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे.
रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास योजनेला दोन लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा अर्थसंकल्पात केली.
वर्षाला एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना 'लखपती दिदी' अंतर्गत स्वयंरोजगारासाठी 1 ते 5 लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 75000 जागा वाढवण्यात आल्या आहेत, हे सरकारचे मोठे यश मानले जात आहे.
कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य हटवलं. कांदा निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आलं.
साखर कारखान्यांतील इथेनॉल निर्मिती प्रकल्प मल्टी-फीडमध्ये रूपांतरित करण्याच निर्णय. या काळात सरकारने 15 लाख कोटींच्या विविध प्रकल्पांना मंजुरी दिली.