Rajanand More
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा विवाहसोहळा सोमवारी (ता. 22 सप्टेंबर) पार पडला. विक्रमादित्य हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.
हिमाचलमधील बुशहर राजघराण्याचे ते वारसदार आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रमादित्य हे या घराण्याचे प्रमुख बनले. तेव्हापासून त्यांना राजा विक्रमादित्य सिंह असे ओळखले जाते.
विक्रमादित्य यांनी चंदीगढमधील डॉ. अमरीन कौर यांच्याशी विवाह केला. त्या पंजाब विद्यापीठामध्ये मानसशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत. त्यांच्या आई-वडिलांचा राजकारणाशी थेट काहीच संबंध नाही.
विक्रमादित्य यांचा हा दुसरा विवाह आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. उदयपूरच्या शाही घराण्यातील राजकुमारी सुदर्शना सिंह यांच्यासोबत विक्रमादित्य यांचा पहिला विवाह झाला होता.
विक्रमादित्य आणि अमरीन यांचे लव्ह मॅरेज आहे. मागील 8 ते 9 वर्षांपासून त्यांची ओळख आहे. राजकारणात प्रवेश करण्याआधी विक्रमादित्य यांचे चंदीगढमध्ये येणेजाणे असायचे. तेव्हापासूनच त्यांनी ओळख होती.
विक्रमादित्य यांच्या पहिल्या विवाहामुळे दोघांमधील नात्यांबाबत सार्वजनिकपणे ते बोलत नव्हते. घटस्फोटानंतरच त्यांनी आपल्या नात्याबाबत भाष्य केले.
विक्रमादित्य हे सध्या हिमाचलच्या राजकारणात अत्यंत सक्रीय आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून दावेदारी सांगण्याची त्यांची तयारी आहे.
विक्रमादित्य यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मंडी मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपच्या उमेदवार अभिनेत्री कंगना रनौत यांच्याकडून ते पराभूत झाले.