Ganesh Sonawane
नाशिक महापालिकेच्या 17 व्या महापौरपदी अखेर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी कुंभमेळा विचारात घेऊन उच्चशिक्षित व अनुभवी असलेल्या हिमगौरी आहेर-आडके यांना नाशिकच्या महापौरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हिमगौरी आहेर-आडके या नाशिक मनपाच्या स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना कामकाजाचा चांगला अनुभव आहे.
हिमगौरी आडके यांना राजकीय वारसा असून त्यांच्या आई शोभना बाळासाहेब आहेर या उपमहापौर राहिल्या आहेत. तर वडील बाळासाहेब आहेर हेही स्थायी समितीचे माजी सभापती आहेत.
हिमगौरी आहेर-आडके यांचे चुलते दौलतराव आहेर हे युती सरकारच्या काळात आरोग्य मंत्री होते.
हिमगौरी आहेर-आडके यांचे चुलत बंधू राहुल आहेर हे चांदवड विधानसभेचे भाजप आमदार आहे.
पुणे येथील कमिन्समधून B.E.IT अभियांत्रिकीचे शिक्षण. पुणे येथे मार्केटिंग आणि फायनान्समध्ये PUMBA मधून MBA.
नाशिकच्या प्रभाग क्रं 7 च्या त्या प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.