Ganesh Sonawane
नागरिक थेट मतदान करून नगरसेवक निवडतात. उदा. नाशिकमध्ये भाजपचे ७२ नगसेवक निवडून आले आहेत.
महापौर पदासाठी आरक्षण ठरवले जाते. ही सोडत सर्व महापालिकांसाठी एकत्र किंवा स्वतंत्रपणे काढली जाते. सोडत निघाल्यावरच कोणत्या प्रर्वगातील व्यक्ती महापौर होऊ शकते हे ठरते.
इच्छुक नगरसेवक महापौर आणि उपमहापौर पदासाठी मनपा मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात अर्ज दाखल करतात.
महापालिकेच्या सभागृहात प्रत्यक्ष मतदानाद्वारे महापौरांची निवड केली जाते. एकच उमेदवार असेल तर बिनविरोध निवड होऊ शकते.
निवडून आलेले एकुण नगरसेवक मतदान करतात आणि सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवाराची महापौरपदी नियुक्ती होते.
महापौरांना शासकीय वाहन, निवासस्थान दिले जाते. महापौर हा देखील नगरसेवकातूनच निवडून गेलेला असतो त्यामुळे त्यांना त्याचे मानधन व भत्ता मिळतो.
महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. त्यामुळे पाच वर्षांच्या महापालिका कार्यकाळात दोनदा महापौर बदलू शकतात.
शक्यतो, ज्या पक्षाला बहुमत असते त्याच पक्षाचा महापौर होतो. बहुमतासाठी साधारणतः अर्ध्यापेक्षा जास्त मते लागतात. उदा. नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे. १२२ पैकी ७२ नगसेवक भाजपचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.