Pradeep Pendhare
कोलकत्ता इथल्या डॉ. मणिकर्णिका दत्त 37 वर्षीय असून, इतिहास संशोधक अभ्यासक आहे.
गेल्या एक दशकापासून त्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास अशून, संशोधन कार्यासाठी ऐतिहासिक नोंदी मिळविण्यासाठी भारतात आल्या होत्या.
डॉ. मणिकर्णिका दत्त युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन इथं इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापक असून, ऑक्सफर्ड, ब्रिस्टल विद्यापीठांमध्ये संशोधन केले आहे.
डॉ. मणिकर्णिका दत्त यांचे पती डॉ. सौविक नाहा यांच्याबरोबर दक्षिण लंडनच्या वेलिंगमध्ये राहतात.
डॉ. मणिकर्णिका दत्त पहिल्यांदा सप्टेंबर 2012 मध्ये विद्यार्थी व्हिसावर 'UK'ला गेल्या, पुढे स्पाउस व्हिसा अन् दत्त यांच्या पतीला “ग्लोबल टॅलेंट” व्हिसा मिळाला होता.
ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या नियमांनुसार, 10 वर्षांत जास्तीत जास्त 548 दिवस परदेशात राहाता येऊ शकते.
डॉ. मणिकर्णिका दत्त 691 दिवस भारतात होत्या. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ब्रिटन सरकारने राहण्याचा फक्त अधिकारच नाकारला नाही, तर डॉ. मणिकर्णिका दत्त यांना देश सोडण्यास सांगितले आहे.