सरकारनामा ब्यूरो
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे.आज सोमवारी (ता.17) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. याचं जागांसाठी महायुतीने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
विधानपरिषदेत पाच जागापैकी तीन जागांसाठी भाजपने रविवारी (ता.16) उमेदवार जाहीर केले होते.
भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं या पाच जागा रिक्त झाल्या होत्या.
उद्या (18 मार्च) ला या अर्जांची छाननी झाल्यानंतर 20 मार्चपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत असणार आहे.
मतदानाची तारीख 27 मार्च आहे. पण, पाचपेक्षा जास्त अर्ज आले नाहीत तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.