Jagdish Patil
राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेल्या राष्ट्रपती भवनात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विवाह सोहळा पार पडणार आहे.
ज्या राष्ट्रपती भवनात जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्यात येते. तिथे पूनम गुप्ता यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
पूनम गुप्ता या CRPF अधिकारी असून सध्या त्या राष्ट्रपती भवनात पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर (PSO) म्हणून कार्यरत आहेत.
गुप्ता यांना राष्ट्रपती भवनात लग्न करण्याची परवागनी खुद्द देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली आहे.
पूनम यांनी राष्ट्रपती भवनात लग्न करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती द्रौपदी मुर्मू यांना केली होती. जी त्यांनी मान्य केली.
गुप्ता या PM नरेंद्र मोदींच्या ताफ्यात कमांडो म्हणून कार्यरत असल्याची चर्चा देखील सुरू होती.
राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा कॉम्प्लेक्समध्ये हा विवाह सोहळा बुधवारी 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे.
पूनम गुप्ता यांचं लग्न CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट असलेल्या अवनाश कुमार यांच्याशी होणार आहे. ते सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहेत.