Krishnaraj Mahadik: भाजप खासदाराच्या घरची 'ही' मराठी अभिनेत्री होणार सून..? मुलासोबतचा फोटो व्हायरल...

Deepak Kulkarni

लोकप्रिय अभिनेत्री...

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरूकडे पाहिले जाते.

Rinku Rajguru | Sarkarnama

...अन् रिंकू राजगुरू रातोरात सुपरस्टार

मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'सैराट' चित्रपटातील आर्चीची भूमिका प्रचंड गाजली अन् रिंकू राजगुरू रातोरात सुपरस्टार झाली.

Rinku Rajguru | Sarkarnama

अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय...

रिंकू राजगुरूचा जन्म महाराष्ट्रातील अकलूज येथे 3 जून 2001 रोजी झाला आहे. तिचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. लहानपणापासून कलेची आवड असल्यामुळे तिनं अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 

Rinku Rajguru | Sarkarnama

सोशल मीडियावरील एका फोटोमुळे चर्चेत

अनेक मराठी-हिंदी चित्रपटांसह वेबस्टोरीमधील भूमिका गाजल्यानंतर आता अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा सोशल मीडियावरील एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

Rinku Rajguru | Sarkarnama

वहिनीपर्यंत जोडलं कनेक्शन..

रिंकू राजगुरूचा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.तसेच नेटकऱ्यांकडून फोटोवर मीम्सचा पाऊस पाडला जात आहे. वहिनीपर्यंत जोडलं कनेक्शन..

Rinku Rajguru And Krishnaraj Mahadik | Sarkarnama

कृष्णराज हा यूट्यूबर

कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं नाव असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांचा कृष्णराज हा सगळ्यात धाकटा चिरंजीव आहे. त्याने राजकारणापलिकडे जात वेगळा मार्ग निवडला आहे. कृष्णराज हा यूट्यूबर आहे. असून त्याच्या चॅनेलचे साडेचार लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

Krishnaraj Mahadik | Sarkarnama

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री रिंकू राजगुरूसोबतचा एक फोटो

कृष्णराज महाडिकांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्री रिंकू राजगुरूसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी ' अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले,' असे कॅप्शनही दिले आहे.

Krishnaraj Mahadik And Rinku Rajguru | Sarkarnama

गमतीशीर कमेंट

भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांनी थेट रिंकू राजगुरूसोबतच फोटो टाकल्यानं चाहत्यांनी गमतीशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी तर थेट 'वहिनी आहे काय' अशीही विचारणा केली आहे.

Dhananjay Mahadik And Krishnaraj Mahadik | Sarkarnama

सोशल मीडियावर क्रेझ

कृष्णराज सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं नेहमीच दिसून येतं. त्याच्या स्वतःच्या यूट्युब चॅनलवर महाडिक फॅमिलीतील अनेक प्रसंग शेअर करत असतो. कृष्णराजची सोशल फेसबुक, इन्स्टाग्रामवर आणि ट्विटवरही प्रचंड क्रेझ आहे.

Krishnaraj Mahadik | Sarkarnama

NEXT : तिनंं मिळवलं असं यश, ज्याला संपूर्ण बिहारनं ठोकला 'कडक सॅल्यूट' !

Manjari Jaruhar | Sarkarnama
येथे क्लिक करा...