Vice-president Election : झाकीर हुसैन की नेहरूंची बहीण? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा धडाकेबाज किस्सा

Aslam Shanedivan

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

देशात सध्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असून आता मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

Vice-president Election | Sarkarnama

उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार

भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात निवडणूक लागली आहे. त्यात कोण विजयी होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Vice-president Election | Sarkarnama

ऐतिहासिक निवडणूकीच्या चर्चा

दरम्यान या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इतिहासातील उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांची चर्चा होत आहे.

Vice-president Election | Sarkarnama

पंडित जवाहरलाल नेहरू

ज्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांना उमेदवारी देण्याची मागणी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या काँग्रेसच्या एका गटाने केली होती.

Vice-president Election | Sarkarnama

विजयालक्ष्मी पंडित

मात्र 1962 साली पंडित नेहरू यांनी विजयालक्ष्मी यांच्या ऐवजी बिहारचे गव्हर्नर झाकीर हुसैन यांना उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजयालक्ष्मीही नेहरूंच्या भूमिकेशी सहमत होत्या

Vice-president Election | Sarkarnama

झाकीर हुसैन

त्यामुळे त्या निवडणुकीत झाकीर हुसैन विरूद्ध सामंतसिंह अशी लढत झाली. त्यावेळी हुसैन यांना 568 मत तर सामंतसिंह यांना 14 मते मिळाली होती.

Vice-president Election | Sarkarnama

पहिले मुस्लिम उपराष्ट्रपती

हुसैन हे भारताचे पहिले मुस्लिम उपराष्ट्रपती बनले. पुढे 1967 मध्ये ते राष्ट्रपतीही बनले होते.

Vice-president Election | Sarkarnama

इंजिनिअर ते महापौर अन् आता थेट पंतप्रधान? शाह बनले तरूणाईच्या गळ्यातील ताईत...

आणखी पाहा