तुम्हाला माहितीये का? पगारी रजा आणि Comp Off मागे बाबासाहेबांचाच मोठा वाटा

Ganesh Sonawane

कामगारांसाठी सुट्ट्या

कामगारांची प्रकृती चांगली राहावी आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी कायद्याने सुट्ट्या देण्यात आल्या. ही संकल्पना कामगार कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली.

Sarkarnama

भरपाईची तरतूद

तथापी सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्याची भरपाई अर्थात ज्याला आपण कॉम्प ऑफ म्हणतो तो देण्याची तरतूद सुरुवातीला नव्हती.

Sarkarnama

मजूर मंत्री

एखाद्या कामगाराने सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्याची भरपाई करण्याची तरतूद करण्यासाठी १ नोव्हेंबर १९४४ रोजी फॅक्टरीज अॅक्ट (दुसरी सुधारणा) विधेयकावर केंद्रीय विधिमंडळात झालेल्या चर्चेला मजूर मंत्री या नात्याने डॉ. बाबासाहेबांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिले.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

पगारी रजा

या विधेयकातील दुसरी तरतूद पगारी रजेबद्दल होती.

Dr. Babasaheb Ambedkar | sarkarnama

तासांची कमाल मर्यादा

याशिवाय बारमाही चालणाऱ्या कारखान्यासाठी आठवड्यात कामांच्या तासांची कमाल मर्यादा ४८ आणि हंगामी कारखान्यासाठी ५४ तासांची मर्यादा निश्चित करणे आवश्यक होते.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

ओव्हर टाइम

त्या वेळच्या फॅक्टरीज कायद्यात 'ओव्हर टाइम'च्या वेतनाबाबत सर्वत्र सारखा नियम नव्हता.

Sarkarnama

सारखा नियम

म्हणून कोणत्याही प्रकारचा कारखाना असो 'ओव्हर टाइम'च्या वेतनाबाबत सर्वत्र सारखा नियम असावा यासाठी वेतनाचा दर दीडपट असावा अशी सुधारणा सुचवली.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

विधेयक सादर

वरील दोन्ही प्रमुख सुधारणा सुचवणारा फॅक्टरीज अॅक्ट १९३४ (सुधारणा) विधेयक २१ फेब्रुवारी १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय विधिमंडळात सादर केला. (संदर्भ - लोकराज्य अंकातील भि. म. कौसल यांचा लेख)

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

NEXT : 'जय भीम'ची घोषणा सर्वप्रथम कोणी दिली, तिची सुरुवात कशी झाली?

येथे क्लिक करा