'जय भीम'ची घोषणा सर्वप्रथम कोणी दिली, तिची सुरुवात कशी झाली?

Ganesh Sonawane

'जय भीम'

जय भीम' ही केवळ एक घोषणा नसून ती जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी स्वाभिमान आणि ऊर्जेचे प्रतीक आहे.

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

'भीमराव' नावाचे लघुरुप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव 'भीमराव' होते. त्यांचा गौरव व आठवण म्हणून आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असलेले लोक 'जय भीम' म्हणतात.

Dr. Babasaheb Ambedkar | sarkarnama

बाबू हरदास

'जय भीम'चा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल. एन. (लक्ष्मण नगराळे) यांनी 1935 मध्ये दिला अशी नोंद आहे.

Jai Bhim Slogan History, | Sarkarnama

प्रखर कार्यकर्ते

बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर व निष्ठावान कार्यकर्ते होते.

Jai Bhim Slogan History, | Sarkarnama

सत्याग्रह

नाशिकच्या काळाराम मंदिरातला लढा, चवदार तळ्याचा सत्याग्रह यासारख्या ऐतिहासिक आंदोलनात हरदास यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

'जय भीम'चा नारा

बाबू हरदास यांनीच 'जय भीम'चा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या 'दलित मूव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स' या पुस्तकात आहे.

Jai Bhim Slogan History, | Sarkarnama

समता सैनिक दल

बाबू हरदास हे डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे सचिव होते.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

अभिवादन

1935 मध्ये जेव्हा चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी काय शब्द वापरावेत असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा बाबू हरदास यांनी 'जय भीम' हा शब्द सुचवला होता.

Jai Bhim Slogan History, | Sarkarnama

विचारांची मशाल

आज ही घोषणा न्याय, समता आणि बंधुत्वाचा आवाज बनली असून ती बाबासाहेबांच्या विचारांची मशाल तेवत ठेवण्याचे काम करत आहे.

Jai Bhim Slogan History, | Sarkarnama

NEXT : जोतिबा अन् आंबेडकर, एकमेकांना न भेटलेले गुरू-शिष्य; पराकोटीची वैचारिक समानता, जाणून घ्या...

Phule And Ambedkar | Sarkarnama
येथे क्लीक करा