Indian Flag : तिरंग्याचे रंग फक्त रंग नाहीत… ती आहे भारताची ओळख; राष्ट्रध्वजाच्या रंगांचा नेमका अर्थ काय?

Rashmi Mane

राष्ट्रध्वज

आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज देशाच्या स्वातंत्र्याचा, अभिमानाचा आणि ओळखीचा प्रतीक आहे. भारतासाठी हा ध्वज म्हणजे आपल्या संस्कृती, ऐक्य आणि स्वातंत्र्याची साक्ष आहे.

Indian Flag | Sarkarnama

भारताचा राष्ट्रीय ध्वज

भारताचा सध्याचा तिरंगा 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने अधिकृतपणे स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 दरम्यान तो भारताच्या अधिराज्याचा ध्वज होता.

Indian Flag | Sarkarnama

तिरंगा

तिरंग्यांच्या तिन्ही रंगांच्या सुंदर संगमामुळे हा ध्वज जगभरात आपला वेगळेपणा निर्माण करतो.

Indian Flag | Sarkarnama

ध्वजाची रचना

तिरंग्यात तीन आडव्या पट्ट्या वर केशरी, पांढरा आणि हिरवा. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे.

Indian Flag | Sarkarnama

केशरी रंगाचा अर्थ

ध्वजातील वरची केशरी पट्टी देशाची ताकद, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील वीरांच्या धैर्याची आठवण करून देतो.

Indian Flag | Sarkarnama

पांढऱ्या रंगाचा अर्थ

मधली पांढरा रंग शांतता, सत्य आणि प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. अशोकचक्र असलेली ही पट्टी राष्ट्राच्या नैतिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करते.

Indian Flag | Sarkarnama

हिरव्या रंगाचा अर्थ

तळाशी असलेला हिरवा रंग भूमीची सुपीकता, प्रगती, विकास आणि समृद्धीचे प्रतिक आहे. तो पर्यावरणाशी असलेले आपल्या देशाचे नाते दाखवतो.

Indian Flag | Sarkarnama

राष्ट्रध्वजाचे प्रेरणादायी मूल्य

तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आणि अशोकचक्रात देशाच्या एकतेचा, धैर्याचा आणि प्रगतीचा संदेश आहे. हा फक्त ध्वज नसून आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा जिवंत प्रतीक आहे.

Indian Flag | Sarkarnama

Next : महाराष्ट्राला मिळाली देशातील ‘Longest’ वंदे भारत एक्सप्रेस, हा आहे संपूर्ण रूट

येथे क्लिक करा