वारकरी हा शब्द कसा तयार झाला?

Ganesh Sonawane

परंपरा

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.

Ashadhi Wari | Sarkarnama

आषाढ व कार्तिक

ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.

Ashadhi Wari | Sarkarnama

दिंडी

पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जाणारा जो भक्तसमूह असतो, त्याला "दिंडी" म्हणतात. या दिंड्यांमधील प्रत्येकजण म्हणजेच वारकरी.

Ashadhi Wari | Sarkarnama

वारी

आपल्याकडे आठवड्यातले जे वार आहेत त्यांना आपण सोमवार, मंगळवार, बुधवार असं म्हणतो. विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी जाणं याला वारी म्हटलं जातं.

Ashadhi Wari | Sarkarnama

उगम्

'वारी' या शब्दाचा उगम् 'वार' या शब्दातून झाला असून, त्याचा अर्थ एखादी गोष्ट नियमितपणे आणि सतत घडणे असा होतो. त्यामुळे वारी म्हणजे विठुरायाच्या दर्शनासाठी नियमितपणे पंढरपूरला जाणे.

Ashadhi Wari | Sarkarnama

वारकरी

वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस 'वारकरी' म्हणतात, ते वेगवेगळ्या वेशभूषेत, हातात टाळ, मृदुंग घेऊन अभंग गात गात, हरिनामाचा गजर करत पंढरपूरकडे वाटचाल करतात.

Ashadhi Wari | Sarkarnama

भक्तीचे वातावरण

या यात्रेत धार्मिक विधींबरोबरच 'रिंगण' सारखे पारंपरिक खेळ, फुगडीसारखे लोकनृत्य आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचे वातावरण निर्माण केले जाते.

Ashadhi Wari | Sarkarnama

NEXT : विठुरायाच्या महापूजेसाठी मानाचे वारकरी कसे निवडतात?

Vitthal Mahapuja | sarkarnama
येथे क्लिक करा