Jagdish Patil
चीनमध्ये थैमान घातलेल्या HMPV या विषाणूने भारतात देखील शिरकाव केला आहे.
महाराष्ट्रातील नागपुरात 2 मुलांना HMPV ची लागण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर HMPV चा धोका कसा टाळायचा आणि त्याचे निदान कसे होते याबाबतची माहिती जाणून घेऊया.
HMPV विषाणूमुळे श्वसन संस्थेमध्ये संसर्ग होतो. सर्व वयोगटांतील लोकांना त्याचा संसर्ग होतो.
खोकला किंवा शिंकण्यातून तसंच बाधित रुग्णाच्या थेट संपर्कात आल्याने या विषाणूचा फैलाव होतो.
सर्दी, घशात संसर्ग, खोकला, ताप अशी लक्षणे HMPV ची लागण झाल्यावर दिसून येतात.
HMPV चा संसर्ग टाळण्यासाठी हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा. खोकताना तोंड व शिकताना नाकाला रूमाल लावा, मास्कचा वापर करा.
HMPV आरएसव्ही किंवा इन्फ्लूएंझा यासारख्या विषाणूंची नक्कल करतो त्यामुळे त्याचे नेमके निदान करणे अवघड आहे. मात्र RTPCR चाचणी निदानाचा सर्वोत्तम मार्ग आहे.