सरकारनामा ब्यूरो
अनेक मुले असतात जे त्यांच्या आई-वडिलांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकारी होतात. पण मामांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकारी झालेल्या मुलीची अनोख कहाणी आपण पाहणार आहोत
2022 च्या बॅचच्या अधिकारी अरीबा नोमान या उत्तर प्रदेश मधील सुलतानपूरच्या आहेत.
यांनी प्राथमिक शिक्षण स्टेला मैरिस कॉन्वेंट स्कूल सुलतानपूर येथून पूर्ण केले.
दहावी, बारावीचे शिक्षण घेण्यासाठी त्या आपल्या मामाबरोबर दिल्लीला गेल्या.
दिल्ली विद्यापीठातून त्यांनी बी.टेक करुन कॉम्प्युटर सायन्स मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. यानंतर त्यांनी बराच काळ त्यांनी मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी केली.
अरीबा यांच स्वप्न होत UPSC क्रॅक करायचं आणि यासाठी तिचे मामा गुफरान अहमद यांनी गॅाड फादरची भूमिका पार पाडली. अरीबा हिने IPS व्हावे अशी गुफरान अहमद यांची इच्छा होती.
मामाला सुलतानपूरचे तत्कालीन मोठे अधिकारी (SDM) प्रमोद पांडे भेटायला आले होते त्यांच्याकडून अरीबा यांनी प्रेरणा घेतली. आणि IPS बनली. UPSC परीक्षेत त्य़ांना 109 रँक मिळाला.