सरकारनामा ब्यूरो
झी मराठीवरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून घराघरांत पोहचलेले आदेश बांदेकर हे अभिनय आणि शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.
बांदेकर यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आहे.
गृहिणींच्या या होम मिनिस्टर शोपासून महाराष्ट्रातील महिलांमध्ये ते भावोजी म्हणून लोकप्रिय आहेत.
होम मिनिस्टर व्यतिरिक्त, हफ्ता बंद, वाह, डीएनए एकमात्र फॅमिली शो आणि डिव्हाइड सारखे इतर अनेक गेम शो देखील होस्ट केले आहेत.
डीडी नॅशनलवरील संगीत अंताक्षरी शो 'ताक् धिना धीन' त्यांनी आयोजित केला होता.
शिवसेनेतील एकनिष्ठतेसाठी उद्धव ठाकरेंनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावर त्यांची नियूक्ती केली होती.
बांदेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि गायक अभिजीत सावंत यांच्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील शिवसेनेचे ते दुसरे सदस्य बनले.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी शिवसेनेत एकनिष्ठतेने काम सुरू ठेवले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी बॅकस्टेजची भूमिका उत्तमरित्या बजावली.