Ganesh Thombare
दिल्लीच्या राजकारणात सध्या 'हॉर्स ट्रेडिंग' हा शब्द चांगलाच चर्चेत आहे.
केजरीवाल यांनी भाजपवर 'हॉर्स ट्रेडिंग'चा आरोप केला आहे.
देशाच्या राजकारणात नेहमी 'हॉर्स ट्रेडिंग' या शब्दाची चर्चा असते.
'हॉर्स ट्रेडिंग'चा अर्थ सौदेबाजी असा होतो.
राजकीय प्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीला हॉर्स ट्रेडिंग म्हटले जाते.
एखाद्या निवडणुकीचे निकाल समोर आले की 'हॉर्स ट्रेडिंग'चा शब्द चर्चेत येतो.
हरयाणातील एका आमदाराने 1967 मध्ये तीनदा पक्ष बदलला होता. त्यानंतर हा शब्द राजकारणात चर्चेत आला.
भारतीय राजकारणात या शब्दाचा वापर आमदार-खासदारांना प्रलोभन देण्यासाठी केला जातो.
'हॉर्स ट्रेडिंग' ला मराठीत घोडेबाजार देखील म्हटलं जातं.