रोजीरोटीपासून आरोग्यापर्यंत… केंद्र सरकारच्या या 5 योजना सामन्यांसाठी आहे खास, तुम्हीही घेऊ शकता लाभ!

Rashmi Mane

उपयुक्त योजना

या 5 सरकारी योजनांमुळे गरीब कुटुंबांचे जीवन बदलत आहे. जाणून घ्या तुमच्यासाठी कोणत्या योजना उपयुक्त आहेत.

Central Government Schemes | Sarkarnama

मूलभूत गरजा

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. ज्यासाठी केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.

Central Government Schemes | Sarkarnama

अंत्योदय अन्न योजना

मिशन अंत्योदय किंवा अंत्योदय अन्न योजनेतून गरीब कुटुंबांना दरमहा मोफत धान्य दिले जाते. यामुळे कोणीही उपाशी राहत नाही.

Central Government Schemes | Sarkarnama

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना पक्के घर दिले जाते. त्यामुळे लाखो गरीबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे.

Central Government Schemes | Sarkarnama

मनरेगा (MGNREGA)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण मजुरांना वर्षातून 100 दिवस हमखास रोजगार मिळतो.

Central Government Schemes | Sarkarnama

राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम

या योजनेअंतर्गत वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना थेट आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे त्यांना आयुष्य सन्मानाने जगता येते.

Central Government Schemes | Sarkarnama

आयुष्मान भारत योजना

सर्वात गरीब 40% कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळतो. ज्यामुळे मोठ्या आजारांवरही आता मोफत उपचार मिळतात.

Central Government Schemes | Sarkarnama

जीवनात बदल

या योजनांमुळे गरीब कुटुंबांना अन्न, रोजगार, निवारा आणि आरोग्याची सुरक्षा मिळाली आहे. त्यासोबतच त्यांचे जीवनमान सुधारले आहे.

Central Government Schemes | Sarkarnama

Next : मतदार यादीतून तुमचं नाव वगळलं गेलंय का? फक्त 2 मिनिटांत करा खात्री! 

येथे क्लिक करा