सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्ग फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही वेगेळी अशी ओळख आहे.
2003मध्ये एका वरिष्ठ बँकेत कॅशियर म्हणून नोकरी करत त्यांनी त्यांच्या करियरला सुरुवात केली.
2005 ला एका कॉमन फ्रेंडद्वारे त्या देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 17 नोव्हेंबर 2005 रोजी ते लग्न बंधनात अडकले.
लग्नानंतरही त्यांनी पार्श्वगायकी, सामाजिक कार्यकर्त्या विविध महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीसांच्या सोबत खंबीरपणे कायमच असतात.
अमृता फडणवीस यांनी केवळ मुख्यमंत्र्यांची पत्नी न राहता स्वत:चीही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अमृता फडणवीस या मनोरंजन क्षेत्राशिवाय विविध सामाजिक उपक्रमातही सहभागी झाल्याचे दिसून येते.
अमृता फडणवीस या गायिका देखील आहेत, त्यांनी गायलेली विविध गाणी देखील चांगरलीच गाजलेली आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे दोघेही आपलं कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य सन्मानाने जगत आहेत.