Congress Manifesto : काँग्रेसचा जाहीरनामा कसा असू शकतो?

Amol Sutar

सर्वतोपरी प्रयत्न

काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आव्हानात्मक असून, 10 वर्षांपासून केंद्रातील सत्तेबाहेर असलेला देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष पुनरागमनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

बेरोजगारी

बेरोजगारी भत्त्यासारख्या योजनांतर्गत थेट खात्यात पैसे देण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. तसेच केंद्र सरकारच्या विभागांमध्ये लाखो रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले जाईल.

Unemployment | Sarkarnama

अग्निवीर

सैन्य भरतीची अग्निवीर योजना बंद करून जुनी भरती योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे.

Agniveer | Sarkarnama

गृहलक्ष्मी

महिलांसाठी गृहलक्ष्मीसारख्या योजनांद्वारे महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित करण्याच्या योजनेसारखी मोठी घोषणा होऊ शकते.

Women | Sarkarnama

एलपीजी

फक्त 500 रुपयांमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन. तसेच प्रत्येक महिलेला 1500 रुपये प्रतिमहिना आर्थिक सहाय दिले जाऊ शकते.

Women | Sarkarnama

शेतकरी

शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्याऐवजी MSP च्या कायदेशीर हमीसह कायदा करण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. तसेच शेतीच्या उपकरणांवरील GST पूर्णपणे काढून टाकेल.

Farmer | Sarkarnama

महागाई

सर्वसामान्यांची सर्वात मोठी समस्या असलेल्या महागाईपासून सुटका करण्यासाठी मोठी पावले उचलली जातील. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन देऊ शकते.

Fuel | Sarkarnama

न्याय योजना

राहुल गांधींच्या महत्त्वाकांक्षी न्याय योजनेच्या धर्तीवर प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये दिले जातील, तसेच मजुरांसाठी आकर्षक योजना आणण्याचे वचन दिले जाऊ शकते.

GST | Sarkarnama

प्रवासातील सवलत

रेल्वे भाडे कमी करणे, ज्येष्ठ नागरिक, महिलांना प्रवासातील सवलती देणे. तसेच रेल्वेचे खासगीकरण होऊ न देण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते.

R

Travel fare | Sarkarnama

NEXT : Rahul Gandhi At Ujjain : महाकालच्या दरबारात राहुल गांधी नतमस्तक झाले, पाहा Photo

येथे क्लिक करा