सरकारनामा ब्यूरो
कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 1818 मध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत हुतात्मा झालेल्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले.
भीमा कोरेगावच्या लढाईत हुतात्मा झालेल्यांना मानवंदना देण्यासाठी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी भेट दिली.
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वर्षाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे सहकुटुंब दर्शन घेत केली.
जामनेरचे भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सिद्धगड येथे भवानी मातेचंदर्शन घेऊन नवीन वर्षाचा शुभारंभ केला.
आमदार अमित देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह तुळजापूर येथे जाऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मनोभावे दर्शन घेतले.
नवीन वर्षाची सुरूवातीला चित्रा वाघ यांनी दरवर्षीप्रमाणे अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.