Mangesh Mahale
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्होटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेलचा (VVPAT) समावेश असतो.
उमेदवारांच्या नावासमोरचे बदन दाबल्यानंतर उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली स्लिप दिसते. तिला VVPAT स्लिप म्हणतात.
मतदानासाठी बदन दाबल्यानंतर VVPAT स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते. त्यानंतर स्लिप कट होऊन बीप वाजतो, स्लिप सीलबंद पेटीत जमा होते.
व्हीव्हीपीएटीमध्ये मत दिलेल्या उमेदवाराचे नाव दिसले नाही तर निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.
VVPAT मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. मतदारांना VVPAT मशीन उघडता येत नाही.
तक्रारीनंतर व्हीव्हीपीएटी मशीन लगेच उघडून स्लिपा मोजल्या जातात.
अडचणींमुळे मतमोजणी थांबली तर याबद्दल ताबडतोब निवडणूक आयोगाला कळवणं, ही रिटर्निंग अधिकाऱ्याची जबाबदारी असते.
विशिष्ट क्रमाने ठेवलेल्या EVM ऑन करून त्यांच्यात नोंदल्या गेल्या मतांची मोजणी होते. वेगवेगळ्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची मोजणी होते.
मतमोजणी सुरु झाल्यानंतर जेव्हा 14 ईव्हीएम मशिन्समध्ये टाकलेल्या मतांची मोजणी पूर्ण होते, तेव्हा एक फेरी पूर्ण झाल्याचे मानली जाते.