सरकारनामा ब्यूरो
अनेक असे लोक असतात जे UPSC परीक्षा पास होण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. तरीही UPSC परीक्षेत उत्तीर्ण होत नाहीत .
त्यापैकी काही मुले अशी असतात जी कमी वेळात जास्त अभ्यास करुन UPSC सारखी कठीण परीक्षा पास करतात. यातीलच एक आहेत देवयानी सिंह.
देवयानी सिंह या हरियाणा मधील महेंद्रपूर येथील आहेत. त्यांनी त्यांच शालेय शिक्षण चंदीगड येथून पूर्ण केल.
देवयानी यांनी बिट्स पिलानी गोवा कॅमस मधून इलेक्ट्रॅानिक्स ॲन्ड इंस्ट्रमेटेशन येथून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे.
देवयानी यांनी UPSC परीक्षा देण्याच ठरवत परीक्षेची तयारी सुरु केली. यानंतर त्यांनी 2016 आणि 2017 मध्ये UPSC ची परीक्षा दिली. त्यांना तीन प्रयत्नात अपयश आले पण त्यांनी हार न मानता पुन्हा एकदा परीक्षा दिली.
2018 मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. ऑल इंडिया 222वा रँक मिळवत त्या UPSCपरीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांची निवड सेंट्रल ऑडिट डिपार्टमेंटमध्ये करण्यात आली होती.
देवयानी यांनी यांनतरही UPSC परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला त्या आठवड्यातून फक्त शनिवार आणि रविवार या दोनच दिवशी अभ्यास करत होत्या.
देवयानी यांचे वडील IAS अधिकारी आहेत. त्यांनी वडीलांनकडून प्रेरणा घेत 2020 मध्ये पुन्हा UPSC ची परीक्षा दिली आणि त्या ऑल इंडिया 11वा रँक मिळवत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत Indian Revenue Service (IRS) अधिकारी झाल्या.