Rashmi Mane
RAW म्हणजे Research and Analysis Wing. ही भारताची गुप्तचर संस्था आहे जी देशाच्या सुरक्षेसाठी परदेशात गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करते.
RAW एजंट हा अत्यंत प्रशिक्षित, हुशार आणि देशासाठी काम करणारा एक गुप्तचर अधिकारी असतो. त्याचं काम अत्यंत गोपनीय असतं.
RAW साठी थेट भरती होत नाही. UPSC किंवा इतर सरकारी सेवेतून अधिकारी निवडले जातात.
RAW मध्ये IPS, IAS, किंवा IFS सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड होते. त्यांना विशिष्ट प्रशिक्षण दिलं जातं.
Indian Army, Navy, Air Force यामधूनही निवड केली जाते. काही वेळा लष्करी अधिकाऱ्यांनाही RAW मध्ये संधी मिळते.
IB मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अनुभवाच्या आधारे RAW मध्ये ट्रान्सफर केली जाते.
काही वेळा अत्यंत विशेष कौशल्य असलेल्या नागरीकांनाही (जसं की भाषेचं ज्ञान, हॅकिंग स्किल्स) RAW मध्ये कॉन्ट्रॅक्टवर संधी दिली जाते.